जगाच्या पाठीवर कुठं ही राहायचे असेल तर सुरक्षितता ही सर्वात मोठी पातळी असते.. जपानची राजधानी टोकियो हे जगातील सर्वात सुरक्षित तर पाकिस्तानची राजधानी कराची हे असुरक्षित शहर आहे. सिंगापूर दुसर्या तर जपानमधील ओसाका तिसर्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे यादीत दिल्ली (43 व्या क्रमांकावर) तर मुंबईचा (45 व्या क्रमांकावर) समावेश करण्यात आला आहे.या सर्वेक्षण मधे ६० शहरांचा समावेश करण्यात आला होता..टॉप-10 शहरांमध्ये अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्समधील एकाही शहराचा समावेश करण्यात आलेला नाही.सर्वात सुरक्षित 10 शहरांमध्ये आशिया आणि यूरोपचा दबदबा कायम आहे. टॉप-10 मध्ये 4 पूर्वोत्तर आशियातील आहेत. यूरोपीय शहर एम्सटर्डम, स्टॉकहोम आणि झुरिचचा समावेश आहे.पर्सनल सिक्युरिटी, डिजिटल सिक्युरिटी, हेल्थ सिक्युरिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरची सिक्युरिटी सारखे 49 निकष लावण्यात आले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews